दिनविशेष : 3 जानेवारी

 


जानेवारी ३ हा ग्रेगरी दिनदर्शि के नुसार वर्षातील ३ वा किंवा लीप वर्षात ३ वा दिवस असतो.

प्रतिवार्षिक पालन

  • ऑक्युपेशन थेरपी दिन
  • बालिका दिन (सावित्रीबाई फुले जन्म दिन)
  • महिला मुक्तिदिन
  • मूलभूत कर्तव्यपालन दिन
  • वर्धापनदिन : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, अ‍ॅपल.

ठळक घटना आणि घडामोडी

पंधरावे शतक :

  • १४३१ - जोन ऑफ आर्क बिशप पिएर कॉशोंच्या हाती लागली.
  • १४९६ - लिओनार्डो दा विन्चीने उड्डाणयंत्राचा एक असफल प्रयोग केला.


सोळावे शतक
  • १५२१ - पोप लिओ दहाव्याने पोपचा फतवा काढून मार्टिन ल्यूथरला वाळीत टाकले.

अठरावे शतक
  • १७७७ - प्रिंसटनची लढाई - जॉर्ज वॉशिंग्टनने चार्ल्स कॉर्नवॉलिसचा पराभव केला.

एकोणिसावे शतक
  • १८१५ - ऑस्ट्रिया, ब्रिटन व फ्रांसने एक गुप्त तह मंजूर करून रशिया व प्रशिया विरूद्ध संयुक्त फळी उभारली.
  • १८२३ - स्टीवन ऑस्टिनने मेक्सिको सरकारकडून टेक्सासमध्ये जमीन मिळविली.
  • १८३३ - ब्रिटनने फॉकलंड द्वीपसमूह बळकाविले.
  • १८३४ - स्टीवन ऑस्टिनला मेक्सिको सरकारने मेक्सिको सिटीत तुरूंगात टाकले.
  • १८५५ - हवाईमध्ये चीनी नागरिकांचे प्रथम आगमन.
  • १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - डेलावेरने संयुक्त संस्थानातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला.
  • १८६८ - जपानमध्ये शोगन सत्ता संपली. मैजी वंश पुन्हा राज्यकर्ता.

विसावे शतक
  • १९२१ - तुर्कस्तानने आर्मेनियाशी संधी केली.
  • १९२५ - बेनितो मुसोलिनीने इटलीत हुकुमशाही जाहीर केली.
  • १९३१ - महात्मा गांधीनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी गोलमेज परिषदेत केली .
  • १९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
  • १९५० - पुणेयेथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन.
  • १९५२ - स्वतंत्र भारतातपहिल्या राष्ट्रीय निवडणुका.
  • १९५७ - हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले विद्युत घटांवर चालणारे पहिले मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
  • १९५८ - सर एडमंड हिलरी हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
  • १९५९ - अलास्का अमेरिकेचे ४९वे राज्य झाले.
  • १९६१ - अमेरिकेने क्युबाशी संबंध तोडले.
  • १९६२ - पोप जॉन तेविसाव्याने फिदेल कास्त्रोला वाळीत टाकले.
  • १९९० - पनामाच्या मनुएल नोरिगाने अमेरिकी सैन्यासमोर आत्मसमर्पण केले.
  • १९९४ - रशियात ईर्खुट्स्क येथून निघालेले एरोफ्लोतचे टी.यू.१५४ प्रकारचे विमान कोसळले. जमिनीवरील एकासह १२५ ठार.


एकविसावे शतक
  • २००४ - ईजिप्तच्या फ्लॅश एरलाइन्स फ्लाइट ६०४ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान लाल समुद्रात कोसळले. १४८ ठार.
  • २००४ - नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.


जन्म
  • १०६ - सिसेरो, रोमन राजकारणी.
  • ११९६ - त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
  • १८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी.
  • १८८३ - क्लेमेंट ऍटली, ब्रिटीश पंतप्रधान.
  • १८८६ - जॅक झुल्च, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १८८८ - कागदी स्ट्रॉचा वापर सुरू.
  • १८९२ - जे.आर.आर.टोकियेन, ब्रिटीश लेखक व भाषाशास्त्री, लॉर्ड ऑफ द रिंग्ज या पुस्तकत्रयीचा लेखक.
  • १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक.
  • १९२१ - चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
  • १९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक.
  • १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
  • १९६९-माजी फॉर्म्युला-१ विश्वविजेता मायकेल शुमाकर
  • १९७१ - आमेर नझीर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

Previous Post Next Post

DOWNLOAD