चालू घडामोडी : ३१ मार्च

_________________________________
वयक्तीवेध  : प्रा. अर्जुन देव
______________________________
- ‘आयएएस’ होण्यासाठी अभ्यास करणाऱ्यांना प्रा. अर्जुन देव यांची पुस्तके माहीत असतात.. मग ‘हिस्टरी ऑफ द वर्ल्ड’ असो, ‘हिस्टरी ऑफ सिव्हिलायझेशन’ असो. ही पुस्तके आजही अभ्यासली जातात. 

- या प्रा. अर्जुन देव यांचे निधन रविवारी, वयाच्या ८०व्या वर्षी झाले. ‘एनसीईआरटी’- अर्थात राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेत कार्यरत असताना रोमिला थापर, बिपन चंद्र, सतीश चंद्र आदी अव्वल आणि जगन्मान्य इतिहासकारांची पुस्तके निघाली, तीही प्रा. अर्जुन देव यांच्या संपादनाखाली.

- ‘देव’ हे त्यांचे आडनाव नव्हे. ‘अर्जुनदेव’ हे त्यांचे नाव. पण जातीचे नाव लावायचे नाही, म्हणून ‘अर्जुन देव’ याच नावाचा स्वीकार त्यांनी अधिकृतपणे केला होता. अखंड पंजाबातील लैया येथे १९३८ साली ज्या कुटुंबात अर्जुनदेव यांचा जन्म झाला, ते फाळणीच्या काळात दिल्लीस आले.

- फाळणीच्या यातना म्हणजे काय हे बालपणीच उमगलेल्या अनेकांचे देशप्रेम पुढे विद्वत्तेच्या रूपाने दिसले, त्यांपैकी अर्जुनदेव हे एक. दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयात ते इतिहास शिकले.

-  अर्जुन देव यांच्या पत्नी इंदिरा या देखील इतिहासकार. या दाम्पत्याने ‘एनसीईआरटी’साठी काम केले.
 चोख, अचूक आणि आधुनिक-वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारी, कोठेही व्यर्थ अभिमानाचे भोंगळ प्रदर्शन न घडविणारी इतिहासाची पाठय़पुस्तके या दोघांनी घडविली.

- काही स्वत: लिहिली, काही इतरांकडून लिहून घेऊन संपादित केली. इतिहासाविषयीचा हा आधुनिक दृष्टिकोन भारतकेंद्री जरूर असावा; पण भल्याबुऱ्या सर्व प्रकारच्या अनुभवांनी आपला वर्तमान व भविष्य समृद्ध करणारा असावा, अशी आस ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिणाऱ्या पं. जवाहरलाल नेहरूंनाही होती. हा विचार कठोर विद्यापीठीय शिस्तीने अमलात आणणाऱ्या इतिहासकारांवर पुढे (१९९५ नंतर) ‘काँग्रेसी’ वगैरे शिक्के मारून त्यांना नाकारण्याचे उद्योग सुरू झाले.


- परिणामी अर्जुन देव लिखित ‘हिस्टरी ऑफ द वर्ल्ड’ हे पुस्तकही होते. ते ‘एनसीईआरटी’ने रद्द केले. मात्र ‘ओरिएंट ब्लॅकस्वान’ने ते प्रकाशित केले आणि आज केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या अनेक संकेतस्थळांवरही तेच वापरले जाते. एकंदर १६ पुस्तके अर्जुन देव यांच्या नावावर असली, तरी महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘टुवर्ड्स फ्रीडम’चे तीन खंड! त्यांपैकी पहिला (१९४१ पर्यंतचा) खंड प्रकाशित झाल्यानंतर, गेल्या साडेपाच वर्षांत पुढील दोन खंड प्रकाशित झाले नव्हते. ते जसेच्या तसे वा तळटीपांसह प्रकाशित होणे, ही प्रा. अर्जुन देव यांच्या विद्वत्तेस खरी आदरांजली ठरेल.

_________________________________
भारतीय स्टेट बँकेनी ‘ग्रीन बाँड’मधून 100 दशलक्ष डॉलर एवढा निधी उभारला
______________________________
- भारतीय स्टेट बँकेनी (SBI) परदेशात ‘ग्रीन बाँड’मधून 100 दशलक्ष डॉलर एवढा निधी उभारला आहे. SBIचे ‘ग्रीन बाँड’ बँकेच्या लंडन शाखेतून दिले जाणार आहेत आणि सिंगापूर एक्सचेंजमध्ये (SGX) सूचीबद्ध केले जाणार आहेत.

- शाश्वत विकासाच्या दृष्टीने SBI बँकेनी तीन महिन्यांच्या लिबोर (लंडन आंतर-बँक प्रस्तावित दर) यापेक्षा 80 बेसिस पॉईंटच्या (bps) सवलत दराने हा निधी उभारण्यात आला.

- ग्रीन बाँडच्या माध्यमातून SBI ने याआधीच दोन टप्प्यात 700 दशलक्ष डॉलर एवढा निधी उभारलेला आहे.

- ‘ग्रीन बाँड’ म्हणजे काय?

- ग्रीन बाँड हे एक असे वित्तीय गुंतवणूक बंध आहेत, ज्यामधून उभारलेला निधी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने त्यासाठी उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांच्या बांधकामांवर खर्च केला जातो.

-  ग्रीन बाँड सोबतच कार्बन मार्केट इन्स्ट्रुमेंट आणि फिनटेक-आधारित ग्रीन फंड ही देखील पर्यायी साधने चलनात आहेत.

- ग्रीन बाँडची बाजारपेठ जागतिक बँकेसारख्या बहुपक्षीय संस्थांसह 50 हून अधिक देशांकडे उपलब्ध आहे. वर्ष 2007 ते वर्ष 2018 या कालावधीत जगभरात 521 अब्ज डॉलर एवढा निधी उभारला गेला.

- ग्रीन बाँड प्रस्तुत करणाऱ्या देशांमध्ये भारत द्वितीय क्रमांकाचा देश आहे.
_________________________________
घरातूनच काम करण्यासाठी ‘TRIFED वन धन’ संकेतस्थळ कार्यरत
______________________________
- आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित (TRIFED) या संघटनेनी इंटरनेट व्हिडीओ आधारित शिक्षण-संवादाचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी GIS तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘TRIFED वन धन’ संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

- हे संकेतस्थळ 50 लक्ष आदिवासी समुदायांच्या संवादाचे भावी माध्यम आहे. 27 मार्च 2020 रोजी या उपक्रमात सहभागी होणाऱ्या 27 राज्यांच्या गटाची चाचणी घेण्यात आली. TRIFED दररोज या गटांच्या किमान 2 बैठका आयोजित करीत आहे.

▪️ठळक बाबी

- देशातल्या 16 प्रमुख IIT आणि IIM संस्थांमध्ये आदिवासी उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी "द टेक फॉर ट्राइबल्स" हा प्रकल्प 19 मार्च 2020 रोजी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यास सुरुवात करण्यात आला.

- 2018 या वर्षापासून चाललेल्या प्रधानमंत्री वन धन योजनेच्या (PMVDY) अंतर्गत नोंदणीकृत आदिवासी वन उपज उत्पादकांमध्ये उद्योजकतेचे कौशल्य निर्माण करणे या उद्देशाने हा कार्यक्रम आहे.

- लोकांना 30 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा कार्यक्रम सहा आठवडे चालणार असून त्यादरम्यान एकूण 12 सत्र घेतले जाणार आहे. ही योजना खेड्यात राहणाऱ्या सुमारे 3.5 लक्ष आदिवासी उद्योजकांना जगातल्या प्रमुख संस्थांशी जोडणार.

- ‘ट्राईब्स इंडिया’च्या माध्यमातून आज जवळपास दीड लक्ष आदिवासी कारागीरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत देशाच्या 22 राज्यांमध्ये TRIFED संस्थेने 1205 वन धन केंद्रे उभारली गेली.

- यामध्ये उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी 3 लक्ष 70 हजार आदिवासींना विविध उपक्रमांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.

- भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित (TRIFED) याची स्थापना 1987 साली झाली.

_________________________________
राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था ‘कोरोना अभ्यास मालिका’ पुस्तके प्रकाशित करणार
______________________________
- भारत सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयांच्या अंतर्गत पुस्तक प्रकाशन आणि पुस्तक संवर्धनासाठी काम करणारी राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) यांनी कोविड-19 या विषयावर अभ्यास मालिका प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

 - भविष्यकाळात मानवी समाजासाठी कोरोना आजारा विषयीच्या जागरूकतेचे विलक्षण मनोवैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन कोरोनाचा प्रभाव ओसारल्यानंतर वाचकांच्या गरजेसाठी सर्व वयोगटांकरिता ही पुस्तके तयार करण्यात येत आहे. उपक्रमाच्या अंतर्गत योग्य वाचन साहित्य तयार करण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती घेतली जात आहे.

- उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ‘सायको-सोशल इम्पॅक्ट ऑफ कोरोना पॅन्डमिक अँड वेज टू कोप’ या उप-विषयावर पुस्तके तयार करण्यासाठी अनुभवी मानसशास्त्रज्ञ / सल्लागारांचा समावेश असलेला एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे.

- कोरोनाच्या विविध पैलूंविषयी जाणून घेण्यासाठी मुलांची पुस्तके तयार केली जात आहोत. जागरूकता, कला, साहित्य, लोकसाहित्य, आर्थिक आणि समाजशास्त्रीय बाबी, कोरोना महामारीतून उद्भवणारी विज्ञान / आरोग्य जागरूकता आणि विलगीकरण, संचारबंदी या विषयांवर आधारित पुस्तकेदेखील नियोजित आहेत.

▪️राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) विषयी

- राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) हे एक भारतीय प्रकाशन गृह आहे, ज्याची 01 ऑगस्ट 1957 रोजी स्थापना झाली.

-  हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत एक स्वायत्त संस्था आहे. आता ही संस्था मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

Previous Post Next Post

DOWNLOAD