चालू घडामोडी : 30 मार्च


_________________________
नवी दिल्लीच्या AIIMS येथे 'कोविड-19 राष्ट्रीय सल्लामसलत केंद्र’ (CoNTeC) उघडले

_________________________

- 28 मार्च 2020 रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (AIIMS) रुग्णालयात 'कोविड-19 राष्ट्रीय सल्लामसलत केंद्र’ (COVID-19 National Teleconsultation Centre / CoNTeC) या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकल्पनेनुसार हे केंद्र तयार करण्यात आले आहे. या सेवेची अंमलबजावणी दिल्लीच्या AIIMS संस्थेद्वारे केली जात आहे.

▪️ठळक बाबी

- देशभरातल्या सर्व चिकित्सकांना थेट वेळेत AIIMSच्या चिकित्सकांशी सल्लामसलत करता यावी आणि कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करता यावेत, यासाठी हे राष्ट्रीय केंद्र सुरु करण्यात आले आहे.

- या केंद्राच्या माध्यमातून देशभरातल्या नागरिकांना 24 तास सल्ला आणि मार्गदर्शन मिळू शकणार आहे. CoNTeC या केंद्रात दृकश्राव्य माध्यमातून देशभरातल्या सर्व रुग्णालयातल्या चिकित्सकांना 24 तास मार्गदर्शन मिळणार आहे.

- साधा दूरध्वनी संच, व्हॉट्सअॅप, स्काईप आणि गुगल डूओ अशा संपर्क माध्यमातून या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

- जगभरातले चिकित्सक कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. किमान भारतात तरी सर्व ठिकाणी उपचारासाठी एकच पद्धत पाळली जावी, यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरते.

- या सेवेचा लाभ घेण्यासाठी ‘+91 911544415’ या क्रमांकावर संपर्क करावा लागणार. प्रथम CoNTeC केंद्राचे व्यवस्थापक हा दूरध्वनी घेणार आणि त्यानंतर संबंधित तज्ञांकडे दूरध्वनी जोडला जाणार.

- केंद्र सरकारकडून ‘टेलीमेडिसिन’च्या मार्गदर्शक सूचना अधिसूचित करण्यात आल्या आहेत, त्याचा लाभ केवळ कोरोनाच नव्हे तर इतर आजारांचा सामना करण्यासाठी देखील होऊ शकतो.


_________________________
भारत सरकारचा नवा 'आपत्कालीन परिस्थितीत प्रधानमंत्री नागरिक सहाय्य व मदत निधी'
_________________________


- कोविड-19 महामारीमुळे देशासमोर आरोग्य आणि आर्थिक समस्या निर्माण होत आहेत.

-  या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे सरकारच्या मदतीसाठी देणगी देण्यासाठी उत्स्फूर्तपणे असंख्य लोकांकडून विनंती केली जात आहे.

- त्यासाठी 'आपत्कालीन परिस्थितीत प्रधानमंत्री नागरिक सहाय्य व मदत निधी' (Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund / PM CARES Fund) या शीर्षकाखाली एक सार्वजनिक धर्मार्थ विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

▪️ठळक बाबी

- पंतप्रधान या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष आहेत. इतर सदस्यांमध्ये संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री यांचा समावेश आहे.

- या निधीमध्ये अगदी छोट्या रकमेची देणगी देखील देता येणार जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपले योगदान देऊ शकणार.

- निधीमध्ये दिलेल्या देणगीला ‘कलम 80 (G)’ अंतर्गत प्राप्तिकरातून सूट देण्यात येणार.

 - डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI (भीम , फोनपे , अमेझॉन पे , गूगल पे, पेटीएम, मोबिक्विक इ.), RTGS / NEFT असे देणगी भरण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

- नागरिक आणि संघटना “pmindia.gov.in” या संकेतस्थळावरून निधीमध्ये देणगी देऊ शकतात.

▪️खाताधारकाचे नाव: PM CARES

▪️खाता क्रमांक: 2121PM20202

▪️IFSC क्रमांक: SBIN0000691

▪️SWIFT क्रमांक: SBININBB104

▪️बक शाखा: भारतीय स्टेट बँक, नवी दिल्ली

▪️UPI ID: pmcares@sbi

_________________________



Previous Post Next Post

DOWNLOAD