चालू घडामोडी : १ एप्रिल

___________________________________________________
WHOची जागतिक आरोग्यसंबंधी आव्हानांची यादी जाहीर
जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्याकडून येणार्‍या दशकात जग ज्या आव्हानांना तोंड देणार आहे, अश्या तातडीच्या 13 आरोग्यासंबंधी आव्हानांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या अहवालात हवामानातले बदल आणि आरोग्य सेवांमधली असमानता अश्या अनेक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आव्हाने पुढीलप्रमाणे आहेत –

1. हवामानविषयक संकट
2. संघर्ष आणि संकटात सापडलेल्या प्रदेशांमध्ये आरोग्य सेवा पुरविणे
3. आरोग्य सेवांमधली असमानता
4. उपचारांची उपलब्धता
5. संसर्गजन्य रोग प्रतिबंधक
6. साथीच्या रोगांसाठी तयारी
7. असुरक्षित उत्पादने
8. आरोग्य कर्मचार्‍यांमधली अल्प गुंतवणूक
9. पौगंडावस्थेमधली सुरक्षा
10. आरोग्य सेवा कर्मचार्‍यांचा नागरिकांमधला विश्वास वाढविणे
11. तांत्रिक प्रगतीचे भांडवलीकरण
12. प्रतिजैविकांना आणि इतर औषधांना होणार्‍या प्रतिरोधाचा धोका
13. आरोग्य सेवेमधली स्वच्छता
या अहवालानुसार, हवामानातल्या बदलांमुळे सुमारे 7 दशलक्ष लोक नकारात्मकदृष्ट्या प्रभावित झाले आहेत. तसेच इतर धोक्‍यांमध्ये इन्फ्लूएंझा आजाराचा उद्रेक आणि HIV, मलेरिया आणि क्षयरोग सारख्या संक्रामक रोगांचा प्रसार हे समाविष्ट आहेत.
तसेच घात, हृदयविकाराचा झटका, श्वसनाचे रोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग या आजारांमुळे जागतिक मृत्युंपैकी एका चतुर्थांशपेक्षा जास्त मृत्यू होतात. वायू प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे या रोगांची शक्यता वाढते. 
WHO बद्दल
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे. दिनांक 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन करण्यात आलेल्या WHOचे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे. हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा एक सदस्य आहे. ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती.
_________________________________________________________

​'आनंदी गोपाळ' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

🎆 पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी विभागात समीर विद्वांस दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ' या चित्रपटाने बाजी मारली आहे. 

🎆 या चित्रपटाला गुरुवारी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार देण्यात आला. 

🎆 आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात ट्युनिशियाच्या 'अ सन' या चित्रपटाने प्रथम येण्याचा मान मिळवून 'प्रभात' आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. प्रेक्षक पसंतीचा चित्रपट म्हणूनही या चित्रपटाने मान मिळवला.

🎆 नऊ जानेवारीपासून सुरू असलेल्या १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (पिफ) सांगता गुरुवारी झाली. 

🎆 महोत्सवादरम्यान विविध देशांमधून आलेल्या ज्युरींनी १९१ चित्रपटांचे परीक्षण करून विजेते घोषित केले. 

🎆 त्यामध्ये आंतरराष्ट्रीय विभागात ट्युनिशियाचा 'अ सन' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. 

🎆 रशियन चित्रपट 'ह्युमरिस्ट' या चित्रपटाला लेखनासाठीच्या स्पेशल ज्युरी सन्मानाने गौरवण्यात आले. 

🎆 मराठी विभागात 'आनंदी गोपाळ' सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.

🎆 चित्रपटाप्रमाणे अजित वाडीकर दिग्दर्शित 'वाय' आणि सुजय डहाके दिग्दर्शित 'तुझ्या आईला' या चित्रपटांनीही चांगले यश मिळवून महोत्सवातील विविध पुरस्कारांवर आपले नाव कोरले. 

🎆आनंदी गोपाळ चित्रपटाचा मुख्य अभिनेता ललित प्रभाकर याला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर 

🎆 'वाय' चित्रपटातील अभिनेत्री मुक्ता बर्वेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
__________________________________________________________

GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी उड्डाण 
🎆 भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून करण्यात आले. 

🎆 या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे.

🎆 जीसॅट-३० हा एक दूरसंचार उपग्रह आहे. हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल. इनसॅट-४ या उपग्रहाची मर्यादाही संपुष्टात येत असून तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे अधिक शक्तिशाली आणि आधुनिक उपग्रहाची आवश्यकता होती. त्यामुळेच इस्रोने जीसॅट-३० चं यशस्वी उड्डाण केलं आहे.

🎆 GSAT-30चं वजन सुमारे ३१०० किलो असून लॉन्चिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. 

🎆 या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असून त्यामुळे ऊर्जा मिळणार आहे. 

🎆 यापूर्वी इनसॅट-४ए हा उपग्रह २००५मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे आता हा नवा उपग्रह लॉन्च करण्यात आला असून त्यामुळे भारतातील दूरसंचार सेवेत सुधारणा होणार आहेत. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. 

🎆 विशेष म्हणजे मोबाइल सेवा ज्या क्षेत्रात अद्याप पोहचू शकलेल्या नाहीत, त्या क्षेत्रात या नव्या उपग्रहामुळे मोबाइल सेवा पोहचू शकणार आहेत. या व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे.

🎆 त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकित वर्तवण्यासाठीह या उपग्रहाची मदत होणार आहे.

🎆 2020 मध्ये भारताकडून एकूण १० उपग्रह लॉन्च करण्यात येणार आहेत. यात आदित्य-एल१ उपग्रहाचाही समावेश आहे. 

🎆 या उपग्रहाला २०२०पर्यंत लॉन्च केलं जाईल. मिशन सूर्याचा अभ्यास करणारा हा पहिला भारतीय उपग्रह असेल. इस्रोने गेल्या वर्षी ६ लॉन्च वाहन आणि ७ सॅटेलाइट लॉन्च केले होते.

🎆 हा उपग्रह दळणवळण, दूरचित्रवाणी आणि प्रसारण क्षेत्रात उच्च दर्जाची सेवा पुरवेल. 3 हजार 357 किलो वजनाचा हा उपग्रह 12-सी, आणि 12 KU बँड ट्रांसपाँडरनी युक्त असून तो इनसॅट-4-ए ची जागा घेईल.


🎆 भारतामधे KU बँडनं, तर आखाती देशात सी बँडनं सेवा पुरवणारा जी सॅट-30 हा उपग्रह 15 वर्षांपर्यंत कार्यरत राहील. 
____________________________________________________________________
Previous Post Next Post

DOWNLOAD