चालू घडामोडी : २९ मार्च


_____________________________
कौशल्य वाढविण्यासाठी IIT गांधीनगर ‘प्रोजेक्ट ISSAC’ उपक्रम

_____________________________

- भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगर (IIT-GN) ही संस्था देशात लागू असलेल्या संचारबंदीच्या परिस्थितीत घरातच असताना त्यांच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी कल्पनाक्षम प्रकल्पांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी ‘प्रोजेक्ट ISSAC’ नावाचा नवा उपक्रम राबवित आहे.

- हा कार्यक्रम तयार करण्यास प्रसिद्ध शास्त्रज्ञ ‘सर आयझॅक न्यूटन’ यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेमधून प्रेरणा घेतली. केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकत असताना 1665 साली लंडनमध्ये आलेल्या ग्रेट प्लेगच्या साथीमुळे त्यांना घरी पाठविण्यात आले होते.

- तेव्हा ते 22 वर्षांचे होते. त्या काळात त्यांनी कॅल्क्यूलस तसेच ऑप्टिक्स आणि गुरुत्वाकर्षणासंबंधी त्यांचे सिद्धांत यासह अनेक गहन शोध लावले होते.

▪️कार्यक्रमाचे स्वरूप

- प्रकल्पाचा भाग म्हणून, लेखन, चित्रकला, कोडिंग, संगीत, कल्पक विधान अश्या अनेक नवीन कौशल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास करण्यासाठी संस्थेतर्फे चार वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात.

- विद्यार्थ्यांना लिखानाची सवय लावण्यासाठी टीव्ही, इंटरनेटवर उपलब्ध मनोरंजक मालिका / चित्रपट / नेत्यांचे संबोधन अश्या चित्रफिती बघून त्याविषयी अहवाल आणि त्यांचे विचार लिहिणे, कम्प्युटर कोडिंगसंबंधी 12 दिवसांची स्पर्धा, अश्या अनेक स्पर्धांचा समावेश आहे.

_____________________________
COVID-19 रुग्णांचा शोध घेण्यासाठी “कोरोना कवच” अॅप
_____________________________


- COVID-19 रुग्णांचा शोध घेण्यासाठी आणि प्रसाराचा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारच्या वतीने “कोरोना कवच” अॅप तयार करण्यात आले आहे. हे मोबाइल अॅप आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी संयुक्तपणे केले आहे.

- “कोरोना कवच” अॅप हे एक भौगोलिक स्थितीवर आधारित असलेले ट्रॅकिंग अॅप आहे, जे आजूबाजूच्या परिसरातलया लोकांना विषाणूच्या संपर्कात असल्यास त्यास विषाणूच्या संसर्गाच्या धोक्याबद्दल जागरूक ठेवते.

- अॅप वैयक्तिक स्वच्छतेची माहिती प्रदान करतो, लक्षणांचे निदान करून रंगाच्या माध्यमातून आरोग्यासंदर्भात वापरकर्त्यांना मार्गदर्शन करतो. हिरवा रंग सर्व चांगले दर्शवितो, केशरी रंग चिकीत्सकांकडे भेट देण्याचे दर्शवितो, पिवळा रंग विलगीकरण करणीचे दर्शवितो, लाल रंग विषाणूने संक्रमित असल्याचे दर्शवितो.

- विषाणूच्या संसर्गाविषयीची देशातली तसेच स्थानिक माहितीही हा अॅप पुरवितो. अॅप एक प्रश्नावली प्रदान करते जी वापरकर्त्यांच्या आरोग्याची नोंद ठेवते.

- या अॅपचे एक विशेष वैशिष्ट म्हणजे हे अ‍ॅप घराबाहेर पडल्यास वापरकर्त्याच्या हालचालींचा मागोवा घेतो आणि एखादी संक्रमित व्यक्ती जवळपास असल्यास वापरकर्त्याला सतर्क करतो.

_____________________________

Previous Post Next Post

DOWNLOAD