चालू घडामोडी : २८ मार्च

___________________
वयक्तीवेध : हिलेल फस्र्टेनबर्ग व ग्रेगरी मार्ग्विलिस
___________________
- संभाव्यता (प्रोबॅबिलिटी) ही गणितातील शाखा काहीशी दुर्लक्षित असली, तरी तिच्या मदतीने ‘गेम थिअरी’, ‘नंबर थिअरी’ आणि ‘कॉम्बिनेटोरिक्स’ या शाखांतील अनेक गूढ प्रश्न सोडवता आले आहेत. या शाखेचा पुरेपूर वापर करणाऱ्या दोन गणितज्ञांना गणितातील ‘आबेल’ पुरस्कार नुकताच जाहीर झाला. यातील एक आहेत जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक हिलेल फर्स्टेनबर्ग, तर दुसरे येल विद्यापीठातील माजी प्राध्यापक ग्रेगरी मार्ग्विलिस. 

- नॉर्वेतील गणितज्ञ निल्स हेन्रिक आबेल यांच्या नावाने दिला जाणारा हा सात लाख अमेरिकी डॉलर्सचा पुरस्कार यंदा विभागून देण्यात येईल. विसाव्या शतकात जे गणितज्ञ उदयास आले, त्यांनी गणितातील संभाव्यतेच्या शाखेचा फारसा विचार केला नव्हता. कारण गणितातील शाखांच्या उतरंडीत संभाव्यता अखेरच्या पायरीवर होती. नंबर थिअरी, बीजगणित, भूमिती या शाखा जास्त जोरात होत्या संभाव्यतेकडे गणिताची उपयोजित शाखा म्हणून तुच्छतेने बघितले जात होते. पण याच संभाव्यतेचा वापर करून काही अमूर्त प्रश्न कसे सोडवता येतात, हे हिलेल फर्स्टेनबर्ग आणि ग्रेगरी मार्ग्विलिस यांनी दाखवून दिले. 

- संभाव्यतेतील पद्धती या गणितात मध्यवर्ती ठिकाणी आणून त्यांनी क्रांती घडवून आणली.
फर्स्टेनबर्ग यांना या पारितोषिकाबाबत फोन आला, तेव्हा त्यांना केवळ ‘नॉर्वे अ‍ॅकेडमी’ असे शब्द ऐकू आले. त्यांना फोनवर नीट ऐकू येत नसल्याने पत्नीला फोन दिला, तेव्हा त्यांना आबेल पुरस्कार मिळाल्याचे समजले. क्षणभर त्यांचा यावर विश्वास बसला नाही. 

- एखादा दारूडा माणूस एखाद्या खोलीत भिंतींना धडकत बसला, तर तो एकाच ठिकाणी किती वेळा येतो यावरून त्या खोलीचा आकार सांगता येतो, त्याला ‘एर्गोडिक थिअरी’ म्हणतात. वस्तूच्या मार्गावरून जागेच्या आकाराचा अंदाज सांगण्याचे हे तंत्र आहे. प्रिन्स्टन विद्यापीठात डॉक्टरेट करताना फर्स्टेनबर्ग यांनी- काही मापनांचा इतिहास व अंकांची क्रमवारी यातून पुढे काय होणार याची संभाव्यता सांगता येते, हे दाखवून दिले. नंबर थिअरी सिद्ध करण्यासाठी त्यांनी संभाव्यतेच्या पर्यायाचा यशस्वी वापर केला. ३, ७, ११, १५ या अंकांच्या मालिकेत पुढे कुठले अंक येतील हे अगदी शेवटच्या पातळीपर्यंत सांगण्यासाठी जे पुरावे होते, ते सोपे करण्याचे काम त्यांनी केले. फर्स्टेनबर्ग यांचा जन्म बर्लिनचा. 

- हे यहुदी कुटुंब दुसऱ्या महायुद्धापूर्वीच अमेरिकेला गेले. तेथील प्रिन्स्टन, एमआयटी, मिनेसोटा विद्यापीठांत काम केल्यानंतर फर्स्टेनबर्ग जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठात गेले.

- तर डॉ. ग्रेगरी मार्ग्विलिस यांनी जे संशोधन केले आहे त्यातून इंटरनेट नेटवर्कची जोडणी व त्यातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला आहे. एक्स्पांडर ग्राफच्या संकल्पनेतून त्यांनी नेटवर्क जोडण्याची प्रक्रिया सुलभ केली. डॉ. मार्ग्विलिस यांचा जन्म मॉस्कोतला. त्यांनी मॉस्को विद्यापीठातून डॉक्टरेट केली. त्यांना तरुण गणितज्ञांसाठीचे फील्ड्स मेडल मिळाले होते, त्या वेळी ते ३२ वर्षांचे होते. पण तेही वंशाने यहुदी असल्याने त्यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी हेलसिंकीला जाण्यापासून रोखण्यात आले. 

- पुढे ते येल विद्यापीठात स्थिर झाले.
वंशभेदाच्या झळा सोसलेल्या दोन व्यक्तींना यंदा आबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

___________________
RBI बँकेनी 3 महिने कर्जावरील EMI ला स्थगिती देण्याचा सल्ला सर्व बँकांना दिला
___________________
- कोरोना विषाणूच्या महामारीमुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांवर उपाययोजना म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) पुढील 3 महिने कर्जावरील मासिक हप्ता (EMI) याला स्थगिती द्या, असा सल्ला सर्व बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांना दिला आहे.

- या सल्ल्यानुसार खासगी आणि सरकारी बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था निर्णय घेऊ शकतात. तसेच गृहकर्ज देणाऱ्या वित्त कंपन्याही ग्राहकांना दिलासा देऊ शकतात. हप्ता माफ केला जाणार नाही. बँका कर्जाची पुनर्रचना करणार.

- RBIचा सल्ला बँकांनी मान्य केल्यास केल्यास 3 महिन्यासाठी संपूर्ण देय रक्कम आणि व्याजासह संपूर्ण EMI स्थगित केला जाणार. 1 मार्च 2020 रोजी थकबाकी असणाऱ्यांच्या कर्जासाठी हा नियम लागू केला जाणार.

▪️RBIचे इतर निर्णय

- भारतीय रिझर्व्ह बँकेनी व्याजदरात मोठी कपात केली. रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात करण्यात आली. त्यामुळे रेपो दर 5.15 वरुन 4.40 टक्क्यांवर आला आहे. 

- तर रिव्हर्स रेपो दर 4.9 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांवर आला आहे. या निर्णयामुळे सर्व प्रकाराच्या कर्जावरील व्याजदर कमी होतात.

- RBIने बँकांचे कॅश रिझर्व्ह रेशियो (CRR) देखील कमी केले. 28 मार्च 2020 पासून सुरू होणार्‍या पंधरवड्यापासून सर्व बँकांचे CRR 100 बेसिस पॉईंटने कमी करून ते निव्वळ डिमांड अँड टाइम लाएबिलिटीज (NDTL) याच्या 3 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

___________________
AEHF-6 उपग्रह: अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’ची पहिली मोहीम
___________________
- अमेरिकेच्या ‘युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स’ या अंतराळ सुरक्षा दलाने 26 मार्च 2020 रोजी त्याच्या प्रथम मोहीमेचा आरंभ केला. मोहिमेच्या अंतर्गत अतिसुरक्षित असलेले अत्याधुनिक लष्करी दळणवळण उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठविण्यात आला आहे.

- अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन या कंपनीने तयार केलेला ‘लॉकहीड मार्टिन अ‍ॅडव्हान्स्ड एक्सट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी’ (AEHF-6) उपग्रह फ्लोरिडाच्या अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला. त्यासाठी अॅटलस V551 अग्निबाण वापरण्यात आला.

- लॉकहीड मार्टिन या कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या ‘AEHF’ जाळ्याचा हा सहावा आणि शेवटचा उपग्रह आहे. सर्व उपग्रह पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत ठेवण्यात आले आहेत.

- ‘AEHF’ उपग्रहांचे जाळे भूमी, समुद्र आणि हवाई अश्या तीनही स्थितीत कार्य करणाऱ्या युद्ध यंत्रणेला वैश्विक, अचूक, संरक्षित दळणवळण क्षमता प्रदान करणार, ज्यामुळे युद्धपरिस्थित समन्वय राखण्यात संरक्षण दलांना मदत होऊ शकते.

- या यंत्रणेची वैशिष्ट्ये म्हणजे हे एन्क्रिप्शन, गुप्तता, कमी व्यत्ययाची संभाव्यता आणि जैमर-रेझीस्टंट आहे आणि अणू हल्ल्यात उद्भवणाऱ्या इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इंटरफेरन्स यालाही टाळू शकण्यास सक्षम आहे.

                     ___________________
Previous Post Next Post

DOWNLOAD