चालू घडामोडी : ७ एप्रिल

__________________________

‘कोरो फ्लू’ लशीची भारतात निर्मिती
__________________________


- भारत बायोटेक कंपनीचा पुढाकार; तीस कोटी डोसचे जगभरात वितरण

-  हैदराबाद येथील भारत बायोटेक या जैवतंत्रज्ञान कंपनीने करोना संसर्गावर नाकावाटे देण्याची लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन (मॅडिसन), लस कंपनी फ्लुजेन यांच्या मदतीने ही लस तयार करण्यात येत असून त्यात भारत बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यांनी ही लस तयार करण्याचे काम सुरू केले असून या लशीचे नाव ‘कोरो फ्लू’ असे ठेवण्यात आले आहे. भारत बायोटेक कंपनी लस तयार करून त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेणार आहे.

- या लशीचे एकूण तीस कोटी डोस जगात वितरित केले जाणार आहेत फ्लू जेन ही लस कंपनी त्यांची सध्याची उत्पादन प्रक्रिया भारत बायोटेकला देणार असून त्यामुळे लशीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे, असे मत भारत बायोटेकचे उद्योग विकास प्रमुख डॉ. राचेश एला यांनी व्यक्त केले आहे.

- या लसीचा भविष्यातील वापर प्रभावीरित्या केला जाऊ शकतो, त्यासाठी हा पुढाकार घेण्यात आल्याचे या वेळी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

▪️करोनाला रोखण्याचे तंत्र

- करोनावर उपचार पद्धती विकसित करण्यासाठी जोरात काम सुरू असून सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणू मानवी पेशीत ज्या दरवाजांनी प्रवेश करतो ते बंद करण्यासाठी एक अभिनव उपचार पद्धती विकसित केली जात आहे. ‘सेल’ या नियतकालिकात प्रसिद्ध संशोधनानुसार सार्स सीओव्ही २ विषाणूला पेशींमध्ये प्रवेश नाकारण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत.

-  कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाचे जोस पेनिंगर यांनी म्हटले आहे की, यातील निकाल उत्साहवर्धक असून संबंधित औषध रक्तवाहिन्या व मूत्रपिंडावर कसा परिणाम करते याचीही माहिती उपलब्ध आहे. एसीई २ हे पेशींवरील प्रथिन सध्या या विषाणूच्या प्रवेशास कारण ठरत आहे. सार्स सीओव्ही २ या विषाणूवरील ग्लायकोप्रोटिनची ओळख एसीई २ प्रथिनामुळे पटवली जाते व विषाणू पेशीत घुसून थैमान घालतो असे दिसून आले आहे.

-  २००३ मध्ये सार्स सीओव्ही १ विषाणूतही ग्लायकोप्रोटिनची ओळख एसीई २ प्रथिनामुळे पटून तो विषाणू पेशीत घुसण्यात यशस्वी होत होता. कुठल्याही विषाणूरोधक औषधात नेमकी विषाणूची पेशीत घुसण्याची क्रिया रोखली जात असते. यात एपीएन ०१ या औषधाने हवा तो परिणाम साधला जातो.


__________________________

  ‘NCC योगदान’ सराव
__________________________



- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) या संरक्षण क्षेत्रातल्या विद्यार्थी संघटनेनी ‘NCC योगदान’ नावाचा उपक्रम देशात राबविण्यास सुरुवात केली आहे.

- या उपक्रमाच्या माध्यमातून नागरी अधिकाऱ्यांना मदत दिली जात आहे. महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानात्मक परिस्थितीत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी गुंतलेल्या विविध संस्थांना मदत देण्याच्या मार्गदर्शक सूचना संघटनेचे सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

- मदत क्रमांक / कॉल सेंटरमध्ये सेवा, आवश्यक वस्तू / औषधे / अन्न यांचे वितरण, नागरिकांना मदत; माहितीचे व्यवस्थापन तसेच रांगेचे आणि रहदारीचे व्यवस्थापन अशी कामे विद्यार्थी करीत आहेत. विद्यार्थी कायदे व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी काम करणार नाहीत.

-  18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले NCC अधिकारीच्या देखरेखीखाली 8 ते 20 च्या गटात काम करणार आहेत.

▪️NCC विषयी

- राष्ट्रीय विद्यार्थी सेना (National Cadet Corps -NCC) ही देशातल्या तरुणाईला शिस्तबद्धता आणि राष्ट्रीय नागरिकत्व क्षेत्रात प्रोत्साहन देणारी भारतीय भुदल, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे.

-  NCCची 1948 साली स्थापना झाली व त्याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे. दरवर्षी NCC कडून मुलगी तसेच मुलग्यांसाठी पर्वतारोहणाच्या मोहिमा आयोजित करते.

__________________________

UNGAने कोरोना महामारीशी लढा देण्याकरिता WHOचा जागतिक  सहकार्याचा प्रस्ताव मंजूर केला
__________________________



- जागतिक आरोग्य संघटनेनी ‘ग्लोबल सॉलिडरिटी टू फाइट द कोरोनावायरस डिसीज 2019 (कोविड-19)’ विषयक ठराव संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत मांडला होता. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ महासभेनी (UNGA) एकमताने मान्यता दिली आहे.

▪️सयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA)

- महामारीशी लढा देण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जाणार आहे. 188 देशांनी हा ठराव स्वीकारला.

- जागतिक महामारीवर आधारित असे पहिलेच दस्तऐवज आहे जे जागतिक संस्थेनी स्वीकारले.

▪️ठरावातल्या ठळक बाबी

- महामारीमुळे समाज व अर्थव्यवस्था, त्याचबरोबर जागतिक प्रवास आणि वाणिज्य या क्षेत्रांवर गंभीर आणि विनाशकारी परिणाम भोगावे लागणार आहेत.

- ठरावात माहिती, वैज्ञानिक ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करून तसेच जागतिक आरोग्य संघटनेनी सुचवलेल्या संबंधित मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करून महामारीला रोखणे, कमी करणे आणि पराभूत करण्यासाठी गहन आंतरराष्ट्रीय सहकार्याची मागणी केली गेली आहे.

- हा ठराव घाना, इंडोनेशिया, लिक्टेंस्टीन, नॉर्वे, सिंगापूर आणि स्वित्झर्लंड या देशांनी तयार केला.

▪️सयुक्त राष्ट्रसंघ (UN)

- आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली.

- सध्या या संघटनेचे 193 सदस्य देश आहेत. UN चे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे,

- ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.


Previous Post Next Post

DOWNLOAD