चालू घडामोडी : ८ एप्रिल

______________________
जागतिक आरोग्य दिन: 7 एप्रिल
______________________

- दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक आरोग्य दिन’ पाळला जातो.

- यावर्षी म्हणजेच 2020 साली “सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्ह्ज” ही या दिनाची संकल्पना आहे.

- यावर्षी जागतिक आरोग्य दिन आरोग्य सेवा पुरविण्यात सर्व परिचारिका आणि सुईणींची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका जगापुढे मांडत आहे आणि त्यांचे कार्यदल बळकट करण्यासाठी जगाला आवाहन करीत आहे.

▪️दिनाचा इतिहास

- 1948 साली जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) प्रथम ‘जागतिक आरोग्य सभा’ आयोजित केली होती. त्या सभेत दरवर्षी 7 एप्रिल ही तारीख जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय वर्ष 1950 पासून प्रभावी करण्यात आला.

- प्रत्येक वर्षी जगाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय निवडला जातो. विषयनिहाय कार्यक्रमांचे आयोजन आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर केले जाते आणि त्यामधून जनजागृती केली जाते.

- जागतिक आरोग्य दिन हा आठ अधिकृत जागतिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे. इतर सात मोहिमा - जागतिक क्षयरोग दिन, जागतिक लसीकरण आठवडा, जागतिक मलेरिया दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक रक्तदाता दिन आणि जागतिक हिपॅटायटीस दिन.


______________________
करोना विषाणूचा खात्मा करण्यात यश; ४८ तासांमध्ये विषाणू मारणारं औषध जगभरात आहे उपलब्ध पण...
______________________

- जगभरामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनला करोनाचा चीनहून अधिक फटका बसला आहे. अशाच अनेक देशांमध्ये करोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. मात्र ही लस शोधण्यासाठी एक ते दीड वर्ष लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

- जगभरातील संशोधक या करोनारुपी संकटावर मात करण्यासाठी लस निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अस असतानाच आता ऑस्ट्रेलियामधील संशोधकांनी, जगभरामध्ये उपलब्ध असणाऱ्या एका अ‍ॅण्टी पॅरासायटीक (परजीवी विरोधी) औषधाच्या मदतीने सेल कल्चर (मानवी पेशींवर समुहाने होणारी करोना विषाणूची वाढ) ४८ तासांमध्ये नष्ट करता येईल असा दावा केला आहे. या संशोधनामुळे वैज्ञानिकांना करोनावर लस बनवण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

- जगप्रसिद्ध संशोधन नियतकालिक असणाऱ्या 'अ‍ॅण्टीव्हायर रिचर्स'मध्ये छापून आलेल्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार, आइवरमेक्टीन (Ivermectin) या औषधाने प्रयोगशाळेमध्ये निर्माण करण्यात आलेल्या करोनाच्या कोवीड-१९ विषाणूचा खात्मा केला. या प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या मोनाश विद्यापिठाच्या काइली वॅगस्टाफ यांनी दिलेल्या माहिनुसार, आइवरमेक्टीनचा एक डोस करोनाच्या आरएनएला (मानवामध्ये डीएनए असतो तसा विषाणूंमध्ये आरएनए असतो) ४८ तासांमध्ये संपवू शकतो.

-  इतकचं नाही तर अवघ्या २४ तासांमध्ये या औषधाच्या मदतीने करोनाच्या विषाणूचा नाश करता येईल असंही या अहवालामध्ये म्हटलं आहे.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आइवरमेक्टीनला जगभरातील वेगवेगळ्या देशातील सरकारांनी मान्यता दिली आहे. हे औषध सध्या इतर विषाणूंमुळे झालेल्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये प्रामुख्याने एचआयव्ही, डेंग्यू, झिका व्हायरस आणि इन्फ्युएंजासारख्या विषाणूंचा समावेश होतो. 

- “या चाचण्या सध्या केवळ प्रयोगशाळेमध्ये करण्यात आल्या आहेत. त्यांचा मानवावरील प्रयोग अजून बाकी आहे. मात्र आइवरमेक्टीन हे एक सुरक्षित औषध म्हणून अनेक ठिकाणी वापरणे शक्य आहे. आता करोनाग्रस्तांवर या औषधाच्या डोसचा कसा परिणाम होतो हे आपल्याला पहावे लागणार आहे,” असं मत वॅगस्टाफ यांनी व्यक्त केलं.

- चीनच्या बाहेर करोनाव्हायरच्या स्ट्रेनचे विलगीकरण करण्यामध्ये ज्या संशोधकांच्या गटाला यश आलं होतं त्या संशोधकांमध्ये एक व्हायरोलॉजिस्ट म्हणून रॉयल मेलबर्न हॉस्पीटलच्या लिऑन कॅली यांचाही सहभाग होता. “आइवरमेक्टीनला करोनावरील उपचारासाठी वापर केला जाण्याबद्दल मी आशावादी आहे. मात्र त्याआधी प्री क्लिनिकल टेस्टींग आणि चाचण्यांमध्ये काय दिसून येते हे सुद्धा आपल्याला पहावं लागेल,” असं मत कॅली यांनी व्यक्त केलं. त्यामुळेच हे औषध जगभरामध्ये उपलब्ध असलं त्याच्या वापराला सरकारची परवानगी असली तरी अद्याप त्याच्या मानवी शरीरावर चाचण्या होणं बाकी आहे. या चाचण्यांमधून जे निष्कर्ष समोर येतील त्याच्या आधारेच मोठ्या प्रमाणात हा औषधाचा वापर करता येईल की नाही हे स्पष्ट होईल, असं जाणकार सांगतात.

______________________
पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर मोदी सरकारने टाकले पैसे, असे तपासा
______________________

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’च्या अंतर्गत देशातील चार कोटी ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यात आले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’ अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना ६२ हजार कोटींची आर्थिक मदत करण्यात आली आहे. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावात वाचण्यासाठी ४.९१ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रूपयांची मदत केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.

- देशात १५ कोटी शेतकरी असून प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत नऊ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची मदत मिळणार आहे. आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांची प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत नोंदणी झालेली नाही. या योजनेत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपयांची मदत मिळते. 

- लॉकडाऊननंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजसंदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे. लॉकडाउन दरम्यान डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात येत आहेत.
असं तपासा पैसे -
सर्व बँकाना सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यास निर्देश देण्यात आले आहेत. खात्यावर पैसे पाठवल्यानंतर प्रत्येकाला मेसेज पाठवला जाईल. त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक खात्याशी सलग्न करावा लागेल. किंवा पासबुक स्कॅन करावे. अथवा एटीएममधून मिनी स्टेटमेंट काढा.
यांना मिळणार नाही लाभ -
माजी किंवा सध्या संविधानीक पदावर कार्यरत असणारे, माजी किंवा सध्या मंत्री, महापौर, जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा किंवा राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा समावेश ते शेती करत असले तरी या योजनेत केला जात नाही. 

- केंद्रात किंवा राज्य सरकारमध्ये अधिकारी त्याचप्रमाणे १० हजारांहून अधिक पेन्शन घेणारे कर्मचारी तसेच डॉक्टर, इंजिनीअर, सीए, वकील, आर्किटेक्ट यापैकी कुणी शेती करत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
पैसे मिळाले नाही तर काय कराल?
जर तुम्हाला या पहिल्या आठवड्यात पैसे नाही मिळाले तर लेखापाल आणि कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क करा. त्यातूनही तुमचं काम पूर्ण झाले नाही, तर केंद्रीय कृषि मंत्रायलाकडून जारी करण्यात आलेल्या टोल फ्री असणाऱ्या PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526 या हेल्पलाइनवर संपर्क करा. त्याचप्रमाणे मंत्रालयाचा दुसरा नंबर 011-23381092 याठिकाणीही तुम्ही संपर्क करू शकता.

______________________
कतूहल : वर्षां जलसंधारण – २
______________________

- घरांच्या किंवा इमारतींच्या छतावरील पावसाच्या पाण्याची शेती किंवा गच्चीवरील पावसाच्या पाण्याची शेती (रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग) ही संकल्पना शहरे/ महानगरांतील वस्त्या तसेच अनेक इमारतींच्या सोसायटय़ांमध्ये मूलभूत आवश्यकता म्हणून रुजायला हवी. या पद्धतीत सपाट अथवा उतरत्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळीद्वारे गोळा करून त्याचा प्रवाह मोठय़ा नळीद्वारे जमिनीवर उतरवला जातो. मग हे पाणी जमिनीत थेट मुरवून जमिनीतील पाण्याच्या साठय़ात भर टाकली जाते- म्हणजेच जमिनीच्या अंतर्गत जलपुनर्भरण केले जाते किंवा हे पाणी थेट जमिनीत न सोडता या पाण्याची साठवणूक केली जाते. 

- या ‘रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे औपचारिक शिक्षण कोणत्याही अभ्यासक्रमात नसल्याने सर्वसाधारणपणे स्थापत्य अभियंते, प्लंबर्स, स्थापत्यविशारद अशा मंडळींच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाने आणि मदतीने आपण अशा प्रकारे पावसाचे पाणी साठवू शकतो. पाणीटंचाईच्या काळात या साठवलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो.

- छतावरील पावसाच्या पाण्याचा अशा रीतीने संकलनासाठी त्या इमारतीच्या परिसराचा अभ्यास करून प्रकल्पाची आखणी करण्यात येते. यासाठी सर्वप्रथम गच्ची अथवा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोजले जाते. हे क्षेत्रफळ आणि त्यावर सरासरी किती पाऊस पडतो, याचे प्रमाण ठरवण्यात येते. 

- ज्या इमारतीसाठी हा प्रकल्प करायचा आहे, त्या इमारतीच्या गच्चीवर पडणाऱ्या पावसाचे पाणी खाली जमिनीपर्यंत वाहून नेणाऱ्या नळांची संख्या आणि हे नळ त्यामधून वेगाने वाहणाऱ्या वजनदार पाण्याचा भार सहन करण्याइतके मजबूत आहेत का, याची खात्री केली जाते. यानंतर अशा रीतीने वाहून आणलेले पाणी लगेच उपयोगात आणण्यासाठी साठवायचे आहे, की विहीर अथवा कूपनलिका यांसारख्या जलस्रोतात पुनर्भरण करण्यासाठी सोडायचे आहे किंवा जमिनीत शोषखड्डा करून ते पाणी साठवायचे आहे, यावर प्रकल्पाची पुढील आखणी करण्यात येते. शोषखड्डे करायचे असल्यास इमारतीच्या लगतच्या परिसरात जलवाहिन्या आणि सांडपाण्याच्या वाहिन्या, नद्या अथवा नाल्यांचे प्रवाह, सेप्टिक टँक्स अथवा वीजवाहिन्या असतील तर या सगळ्यांपासून सुरक्षित अंतरावर शोषखड्डे केले पाहिजेत.

-  छतावरील पावसाच्या पाण्याबरोबर ते वाहून नेणाऱ्या नळामध्ये कचरा शिरू नये म्हणून या नळाच्या दोन्ही टोकांना जाळी, उत्तम दर्जेदार प्रतीच्या प्लास्टिकचे नळ, या नळांची जोडणी अत्यंत काटेकोरपणे करण्यासाठी उत्तम प्रतीचे अ‍ॅडेझिव्ह, पाणी जमिनीजवळ पोहोचल्यावर सुरुवातीचा प्रवाह विसर्जन करणारी यंत्रणा, इत्यादी घटक गच्चीवरील पाण्याचे जलसंकलन करताना ध्यानात घ्यावे लागतात.
विद्याधर वालावलकर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२

______________________
जीडीपी क्रमवारीत भारत सातव्या स्थानावर:-______________________

- जागतिक बँकेनुसार जीडीपीच्या क्रमवारीत भारत सातव्या स्थानी आला आहे. २०१७ मध्ये भारताने फ्रान्सला मागे टाकत पाचवे स्थान प्राप्त केले होते. २०१८ मध्ये हा जीडीपी २.७ ट्रीलीयन डॉलरसह अमेरिका प्रथम स्थानावर आहे .

 - अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर चीन (१३.६ ट्रिलियन डॉलर्स) आहे. तर तब्बल ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या स्थानावर जर्मनी पाचव्या स्थानावर ब्रिटन तर सहाव्या स्थानावर फ्रान्स आहे.

-  अर्थशास्त्रज्ञांच्या मते, चलन चढ-उतार आणि आर्थिक वाढीतील मंदी यामुळे भारत जागतिक जीडीपी क्रमवारीत 7 व्या स्थानावर घसरला आहे.

 - 2017 मध्ये भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढ झाली होती, तर 2018 मध्ये ते डॉलरच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घसरला होता.

- भारतीय अर्थव्यवस्थेत रुपयाच्या दृष्टीने 2018-19 मध्ये 11.2 टक्के वाढ झाली आहे, तर 2017-18 मध्ये ती 11.3 टक्क्यांनी वाढली आहे.

 ▪️सरक्षित शहर निर्देशांक 2019

निर्देशांक जारी करणारी संस्था - The Economist Intelligence Unit

- 5 खंडातील एकूण 60 देशांच्या शहरांचा अभ्यास

- जगातील सर्वात सुरक्षित शहर - टोकियो (निर्देशांकात प्रथम स्थानी)

द्वितीय स्थान - सिंगापूर

तृतीय स्थान - ओसाका

 ▪️भारत :-
- भारतातील मुंबई 45 व्या स्थानी
दिल्ली - 52 व्या स्थानी
भारताच्या शेजारील देशांचा विचार करता पाकिस्तान च्या कराची शहराचा ५७ व क्रमांक लागतो तर बांगलादेशाची राजधानी ढाका शहरांचा ५६ व क्रमांक लागतो

- 4 निकषांच्या आधारे निर्देशांक काढला जातो.
1. डिजिटल सुरक्षा
2. पायाभूत संरचनांची सुरक्षितता
3. आरोग्य सुरक्षितता
4. व्यक्तिगत संरक्षण

▪️दशाच्या सातव्या आर्थिक गणनेला त्रिपूरा मध्ये सुरूवात :

- देशातील कृषी क्षेत्राव्यतीरिक्त इतर आर्थिक क्षेत्रांच्या संबंधीत सातव्या आर्थिक गणनेचा प्रारंभ त्रिपूरा मध्ये
29 जुलै 2019 पासून करण्यात आला आहे. त्रिपूरानंतर पुदुचेरी मध्ये आर्थिक गणना करण्यात येणार आहे. यापूर्वी सहावी आर्थिक गणना २०१३ मध्ये करण्यात आली होती. देशात या अगोदर सहा आर्थिक गणना पार पडल्या आहेत अनुक्रमे:- 1977, 1980, 1990, 1998, 2005 व 2013 मध्ये आर्थिक गणना करण्यात आली आहे.

 ▪️जागतिक राहण्यायोग्य सूची २०१९:-

- आर्थिक गुप्तचर विभागाची (इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट- ईआययू) "जागतिक राहण्यायोग्य सूची-2019' अहवाल प्रसिद्ध केला या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर सलग दुसऱ्या वर्षी व्हिएन्ना (आॅस्ट्रीया) या शहराने प्रथम क्रमांक राखला. तर भारतातील दिल्ली आणि मुंबई यांचा क्रमांक घसरला आहे. दिल्लीचा क्रमांक ११२ वरून ११८ पर्यंत खाली आला आहे तर मुंबई गेल्या वर्षी ११७ व्या स्थानावर होती यंदाच्या यादीत क्रमांक दोन ने घसरून ११९ व्या स्थानी आहे. या निर्देशांकामध्ये जगातील १४० शहरांची क्रमवारी लावण्यात आली आहे शहरामध्ये
- राहण्यासाठी जगातील सर्वात उत्कृष्ट शहरे
क्रमांक शहर देश
१. व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
२. मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)
३. सिडनी (ऑस्ट्रेलिया)
४. ओसाका (जपान)
५. कॅलगिरी (कॅनडा)

 - राहण्यासाठी जगातील सर्वात अयोग्य शहरे
क्रमांक देश
१४०.दमास्कस (सीरिया)
१३९.लागोस (नायजेरिया)
१३८.ढाका (बांगलादेश)
१३७.त्रिपोली (लिबिया)
१३६.कराची (पाकिस्तान)

- या निर्देशांकात भारतातील पुढील दोन शहर समाविष्ट आहे
१. नवी दिल्ली (क्रमांक :- ११८)
२. मुंबई क्रमांक - ११९)

 - या निर्देशांकामध्ये शहरांचे सर्वकण करताना पुढील पाच निकष वापरण्यात आलेले आहेत
१. स्थिरता
२. स्वारस्थ रक्षा
३. संस्कृती व पर्यावरण
४. शिक्षण
५. पायाभूत सुविधा

-  २०१८ च्या निर्देशांकामध्ये व्हिएन्ना शहर प्रथम स्थानावर तर मेलबर्न, वोसाका,कॅलगरी, सिडनी अनुकमे दुसऱ्या,तिसऱ्या,चौथ्या व पाचव्या स्थानावर होते


Previous Post Next Post

DOWNLOAD